AmravatiLatest NewsSports
विद्यार्थी खेळाडू, शिक्षक, कर्मचा-यांकरिता विद्यापीठात आधुनिक व्यायामशाळा सज्ज

अमरावती :- आंतर महाविद्यालयीन व आंतर विद्यापीठ विविध क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या उद्देशाने व विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विद्यापीठ परिसरातील परिक्षक वसतीगृहामध्ये आधुनिक व्यायामशाळेची उभारणी करण्यात आली आहे. नाममात्र शुल्काचा भरणा करुन व्यायामशाळेचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. तरी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व्यायामशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.