शिरजगाव बंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदूर बाजार :- शिरजगाव बंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या ‘365 दिवस रक्तदान’ या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
पाहूया संपूर्ण रिपोर्ट…
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे माजी सैनिक स्व. दिलीपराव सावरकर आणि स्व. हरिभाऊ नाणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा सचिव श्री. विलासराव तायवाडे आणि नितीन टिंगणे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले.
या शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. विशेष म्हणजे, भाजपा शाखाध्यक्ष नितीन टिंगणे यांचा वाढदिवसही रक्तदानाने साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे अध्यक्ष प्रमोदराव कोरडे, आशिष कोरडे, माजी नगरसेवक गोपाल तिरमारे, सुखदेवराव पवार, संजू तेलकर, गजू पारिशे, गजानन कडू, वैभव घाटोळ, विकी राठी, अभिजीत तायडे, नयन जावरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच, लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या डॉक्टर अविनाश बाबर, सिद्धार्थ गजबे, सौरभ नाकोडे, निकिता सोळंके, शारदा तळेकर, पिंकी शिवरगा, विकास विके, आकाश गोरले, नरेश सहारे, शंकर तुरंकर यांनी रक्तदान प्रक्रियेचे सुयोग्य नियोजन केले.
शिरजगाव बंड येथे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक भान राखण्याचा एक उत्तम उपक्रम पाहायला मिळाला. ‘365 दिवस रक्तदान’ या संकल्पनेतून अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहे.
अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी बघत राहा City News.