अकोट तालुक्यात ‘देठसूकी’ रोगाचा संत्रा बागांवर मोठा परिणाम

अकोट :- संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का! ‘देठसूकी’ रोगामुळे संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संत्रा पट्ट्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून, शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
पाहूया सिटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये
अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून ‘देठसूकी’ रोगामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. या समस्येमुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात संत्री विकावी लागत आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या अनुदान आणि मदतीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत असून, त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “अकोट तालुक्यातील उमरा, पणज आणि अकोलखेड या महसूल मंडळांमध्ये संत्रा लागवडीचे मोठे क्षेत्र असून, जवळपास चार ते साडेचार हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या ‘देठसूकी’ रोगाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाऱ्याची मंद झुळूक जरी आली तरी झाडाखाली संत्र्यांचा खच दिसून येतो. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील. आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य अंधारमय होत चालले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. आता प्रशासनाने पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देणार का? हा मोठा प्रश्न आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News .