अमरावतीत खासगी रुग्णालयांची धडक तपासणी मोहीम सुरू

अमरावती :- अमरावतीतील खासगी रुग्णालयांची धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयांची कसून पाहणी केली जात आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाहुयात हा संपूर्ण अहवाल :-
अमरावती शहरातील एकूण २३३ नोंदणीकृत रुग्णालयांवर महानगरपालिकेने धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निशामक ना-हरकत प्रमाणपत्र, इलेक्ट्रिक ऑडिट, बायो वेस्ट परवानगी, स्ट्रक्चरल ऑडिट आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यासारख्या महत्त्वाच्या बाबींची तपासणी सुरू आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या या धडक तपासणीमुळे रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का? कोणत्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या? या सर्व घडामोडींसाठी पहात राहा City news.