नागपुरात धाडसी चोरी – पाचपावली पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला घेतले ताब्यात!

नागपुर :- नागपूर शहरात पुन्हा एकदा एक धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. ३ मार्च रोजी कामठी रस्त्यावरील गो गॅस इलेक्ट्रिक शोरूम बंद केल्यानंतर, चोरट्यांनी मोठा हात मारला! टीव्ही, कॉम्प्युटर, प्रिंटरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मात्र, पाचपावली पोलिसांनी केवळ २४ तासांत आरोपीचा शोध घेत, हा गुन्हा उघडकीस आणला आहे!
पाहुया संपूर्ण तपशील..
नागपूर शहरात ३ मार्च रोजी एक मोठी चोरीची घटना घडली. कामठी रोडवरील गो गॅस इलेक्ट्रिक शोरूममध्ये चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्रीच्या वेळी शोरूम बंद होताच अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला.चोरीस गेलेला मुद्देमाल टीव्ही कॉम्प्युटर प्रिंटर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे असा होता.
चोरीचा एकूण माल ३.२० लाख रुपये इतका होता! पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीचा शोध सुरू केला.
२४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला पकडले! आरोपी: प्रकाश सुखराम बिष्णोई (वय २७) रा. यशोधरा नगर, नागपूर याला पोलिसांनी अटक केली
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले ऑटोही जप्त केले! संपूर्ण ३.२० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या मोठ्या तपासाची माहिती पाचपावली डीबी पोलीस कोकाटे, पवन भटकर आणि त्यांच्या टीमने दिली.
चोरीचे गुन्हे वेगाने वाढत असले तरी नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे! अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी न्यूज नागपूर सोबत राहा.