नागपुरात मोठी चोरी उघड! इलेक्ट्रॉनिक शोरूम फोडून लाखोंचा ऐवज लंपास, पोलिसांची धडक कारवाई

नागपुर :- नागपुरात पुन्हा एकदा मोठी चोरी उघडकीस आली आहे! एका इलेक्ट्रॉनिक शोरूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. मात्र, नागपूर पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपीला जेरबंद केले आहे. कोण आहे हे आरोपी आणि काय आहे संपूर्ण प्रकरण?
जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये…
नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी अचूक गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांचे इलेक्ट्रॉनिक सामान विक्रीचे शोरूम बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात वस्तू चोरून नेल्या. या चोरीत 70,700/- रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
तपासाअंती, पोलिसांनी तांत्रिक माध्यमांचा आणि गुप्त माहितीचा आधार घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची PIAGGIO कंपनीची MH-49-D-6965 क्रमांकाची गाडी (किंमत 2.5 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली.सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करून नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
नागपूर पोलिसांनी दाखवलेली जलदगती आणि अचूक कारवाई यामुळे एका मोठ्या चोरीचा उलगडा झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागपूरकरांमध्ये चिंता वाढली आहे. यापुढे असे गुन्हे टाळण्यासाठी नागपूर पोलिसांनी आणखी कडक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.