नागपूर हत्या प्रकरण – अल्पवयीन मुलाच्या कबुलीने उघड झाला धक्कादायक सत्य!

नागपूर :- नागपूरमध्ये एक खळबळजनक हत्या प्रकरण समोर आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने घरात घुसून पापा मडावी यांची हत्या केली होती. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे! पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन संशयिताने खून केल्याची कबुली दिली आहे! काय आहे या गुन्ह्याच्या मागचे सत्य?
पाहूया सविस्तर :-
२५ फेब्रुवारी रोजी नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्यात पापा मडावी यांच्या हत्येची तक्रार दाखल करण्यात आली होती. मृतकाचा मुलगा श्रीकांत मडावी याने ही तक्रार दिली होती, ज्यामध्ये एका अज्ञात इसमाने घरात शिरून त्यांची हत्या केल्याचे नमूद होते. गुन्ह्याचा तपास सुरू होताच कोराडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ५ यांनी तपासाची चक्रे फिरवली.
हत्येचे कारणच स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिली! मृतक पापा मडावी आणि विधीसंघर्षित बालकाची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती.
दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुरू झाले होते. मृतकाचे विधीसंघर्षित बालकासोबत अनैतिक संबंध होते, त्यामुळे तो त्रस्त झाला होता. शेवटी, मानसिक तणावामुळे अल्पवयीन मुलाने खून करण्याचा निर्णय घेतला आणि पापा मडावी यांचा जीव घेतला! या प्रकरणावर शहर गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सिटी न्यूजशी खास संवाद साधत गुन्ह्याचा उलगडा केला.
हा संपूर्ण प्रकार समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. अल्पवयीन मुलांना कुठल्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते आणि काही वेळा त्यांचे आयुष्यच बिघडते. पोलिसांनी या प्रकरणाचा मोठा खुलासा केला असला, तरी समाजानेही याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.