LIVE STREAM

Accident NewsLatest NewsMaharashtra

पालघरमध्ये अपघात; अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, 4 जण जखमी

पालघर :- पालघर मनोर रस्त्यावर शेलवली गाव हद्दीत रेमी कंपनीसमोर झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला झाला असून चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. कामावरून रिक्षाने घरी परतत असताना सायंकाळी ही गंभीर घटना घडली आहे. या अपघातात उज्वला रमेश जाधव रा. देवकोप, तांडेलपाडा हिचा मृत्यू झाला. बुलेट ट्रेन प्रकल्पसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाकडून हा अपघात झाला असून वाहचालक फरार आहे.

कामावरून रिक्षाने घरी जात असताना हा अपघात घडला. रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे हा रामभाऊ सापटे शेलवली दस्तुरपाडा, उज्वला उमेश जाधव देवकोप तांडेलपाडा, सुनीता वाढान देवकू पाटील पाडा व इतर यांना देवकोप येथे घेऊन जात होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या जीजे ०८ सी ६९०९ ही भरधाव बोलेरो जीप मनोरकडून पालघरकडे येत असताना तिने पालघर वाहिनी सोडून मनोर वहिनीकडे जात असलेल्या या रिक्षासह मोटारसायकलला जोरदार धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातात रिक्षा व मोटरसायकल तसेच बलेरो जीप चक्काचूर झाली. अपघात घडल्यानंतर जखमी रामभाऊ सापटे, उज्वला जाधव, रिक्षा चालक चंद्रकांत म्हात्रे यांना स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुनीता वाढण व बाईक स्वार समीर लढे यांना पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उज्वला उमेश जाधव यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रामभाऊ सापटे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बोलेरो जीप चालक फरार असून याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. मृत्यू झालेल्या उज्वला जाधव या परिचारिका असून बोईसर येथील एका रुग्णालयात त्या काम करत होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!