महानगरपालिका अतिक्रमण विभाग व समाज कल्याण विभागाद्वारे संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही
अमरावती :- झोन क्रमांक ०१ अंतर्गत सुरुवात नवीन तहसील इमारत पासून ते पंचवटी चौकापर्यंत मुख्य रस्त्यावरील नागरिकांद्वारे सार्वजनिक फूटपाथ/नालीवरील सामाजिक न्याय विभाग असे नमूद असलेले गटई स्टॉल लोखंडी खोके, शासनाचे अटी शर्तीचे पालन न करता भाजीपाला,हॉटेल कॅन्टीन, टू व्हीलर वाहन दुरुस्ती गॅरेज, मास विक्री, पानठेले,व काही ठिकाणी हुबेहूब डुप्लिकेट खोके लावून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत असल्यामुळे तातडीने सदर अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश मा.आयुक्त व मा. उपायुक्त प्रशासन यांनी दिले.
बुधवार दिनांक, ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत सदर अतिक्रमण जे.सी.बी. मशिनीद्वारे काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही मध्ये 22 गटई स्टॉल जप्त करण्यात आलेले आहे.
सदर कार्यवाही मध्ये समाज कल्याणचे विभागाचे प्रतिनिधी, श्री. ऋषिकेश तायडे,निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख ,श्री. योगेश कोल्हे, श्याम चावरे, निरीक्षक अन्सार अहमद, शुभम पांडे, ससनर विभागाचे जागा निरीक्षक, श्री भांडे, पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही नियमित सुरू राहील.