विज्ञान दिवस-2025 ची रोटेटिंग ट्रॉफी मायक्रोबॉयलॉजी विभागाने जिंकली
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘विज्ञान दिवस-2025’ निमित्त विद्याथ्र्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय समारंभात विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले. तर विज्ञान दिवस-2025 ची रोटेटिंग ट्रॉफी मायक्रोबॉयलॉजी विभागाने जिंकली. मायक्रोबॉयलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन फिरके यांना रोटेटिंग ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नवपोक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधशास्त्र विज्ञान विभागाचे प्रो.डॉ. दादासाहेब कोकरे, विज्ञान दिवस कार्यक्रमाचे समन्वयक व भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. गजानन मुळे उपस्थित होते.
सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, मायक्रोबॉयलॉजी, अप्लाईड इलेक्ट्रॉनिक विभागाच्या विद्याथ्र्यांनी सायन्स क्विझ, पोस्टर मेकिंग, व्हिडिओ मेकिंग, सायन्स किट मेकिंग, सेमिनार अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. गुणानुक्रमे मायक्रोबॉयलॉजी विभाग प्रथम, बायोटेक्नॉलॉजी विभाग व्दितीय, केमिकल टेक्नॉलॉजी विभाग तृतीय, कॉम्प्युटर सायन्स विभाग चतुर्थ, भौतिकशास्त्र विभाग पाचवा, तर अप्लाईड इलेक्ट्रॉनिक विभागाला सहावा क्रमांक मिळाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. दादासाहेब कोकरे म्हणाले, भविष्य घडविण्याचे विद्याथ्र्यांचे हेच वय असून या वयातच विद्याथ्र्यांनी प्रामाणिक आणि जिद्दीने कठोर परिश्रम केल्यास निश्चितच यश गाठता येईल. एकमेकांच्या सहयोगाशिवाय संशोधन देखील पूर्णत्वास येणार नाही, त्यामुळे विद्याथ्र्यांनी आतापासूनच त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील डॉ. कोकरे यांनी याप्रसंगी विद्याथ्र्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अजय लाड म्हणाले, आपल्या विद्याथ्र्यांचा पुरस्काराने गौरव होत असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद शिक्षकांना नाही आणि शिक्षकांना सुध्दा आपल्या विद्याथ्र्यांनी अधिकाधिक नावलौकीक करावा, हेच अपेक्षित असते.
संत गाडगे बाबा, सर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करुन महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. अजय लाड यांनी विद्यापीठाच्यावतीने डॉ. दादासाहेब कोकरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक तसेच प्रमुख अतिथींचा परिचय व पुरस्कार वाचन डॉ. गजानन मुळे यांनी केले. सूत्रसंचालन कु. हर्षा देशमुख, तर आभार डॉ. ए.बी. नाईक यांनी मानले. कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, डॉ. अनिता पाटील, डॉ. वैशाली धनविजय, डॉ. सुजाता काळे, डॉ. देशमुख, डॉ. सोळंके यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.