विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांची कौटुंबिक न्यायालयाला शैक्षणिक भेट
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी नुकतीच स्थानिक कौटुंबिक न्यायालय तसेच विधी सेवा प्राधिकरणला शैक्षणिक भेट दिली. भेटीदरम्यान विद्याथ्र्यांनी न्यायालयीन प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत माहिती जाणून घेतली. विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्या. मंगला कांबळे यांनी विद्याथ्र्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांबाबत विद्याथ्र्यांना माहिती दिली. उपन्यायभीरक्षक अमित साहारकर यांनी सुध्दा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यांबाबत विद्याथ्र्यांना माहिती दिली. उपन्यायभिरक्षक भावना ठाकरे यांनी प्रतिबंधक कायदा 2005, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि विवाह प्रतिबंधक कायदा याबद्दल विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणचे मुख्य न्यायरक्षक जितेंद्र देशमुख यांनी प्रतिबंध कायदा आणि मनोधैर्य योजना याबदल मार्गदर्शन केले. तसेच विद्याथ्र्यांच्या शंकांचे निरसन केले.
कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक श्री. संजय तेलरांधे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना कौटुंबिक न्यायालयाचा इतिहास, स्थापन्याचा उद्देश याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच समुपदेशनाचे महत्व, तंत्रे सांगितली व नातेसंबंधाबाबत विविध प्रकरणावर चर्चा केली. तसेच विद्याथ्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
या शैक्षणिक भेटीचे आयोजन प्रा. वनिता राऊत यांनी केले. प्रा अरुणा तसरे यांच्या मार्गदर्शनात ही शैक्षणिक भेट संपन्न झाली. यावेळी प्रा. श्रद्धा हरकंचे, ऋतुजा ठाकरे, विभागाच्या विद्याथ्र्यांसह इंदिराबाई मेघे महिला महविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. आभार प्रा. पूजा अलोने यांनी मानले.