विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त ‘सावित्रीबाई फुले व महिला सक्षमीकरण ’ विषयावर 8 मार्च रोजी कार्यशाळेचे आयोजन

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. समुपदेशन व मानसोपचार अभ्यासक्रम आणि मातोश्री मुलींचे वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता ‘सावित्रीबाई फुले आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर विद्यापीठ परिसरातील स्व.डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10.00 वाजता कार्यक्रमाची नोंदणी सुरु येईल. सकाळी 11.00 वाजता अमरावतीच्या विभागीय आयुक्त भा.प्र.से. श्रीमती ·ोता सिंघल यांचे शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषवतील. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार सौ. नवनीतजी राणा, तर बीजभाषक म्हणून भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या माजी मराठी विभागप्रमुख डॉ. अलका गायकवाड यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान भारतीय महाविद्यालय, अमरावतीच्या प्राचार्य डॉ. आराधना वैद्य भूषविणार असून ‘विदर्भातील स्त्रियांचे शैक्षणिक क्रांतीतील योगदान’ या विषयावर आय.एस.डी.एस., नागपूरचे संचालक डॉ. आनंद मांजरखेडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य सौ. जयश्रीताई कुलकर्णी व सौ. मयुरीताई जवंजाळ उपस्थित राहतील.
दुसया सत्राचे अध्यक्षस्थान आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे भूषविणार असून ‘लैंगिक समानता : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावर विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरचे सहा. प्राध्यापक डॉ. भगवान फाळके प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीच्या प्राध्यापक डॉ. अर्चना बोबडे उपस्थित राहतील.
दुपारी 4.00 वाजता समारोप सत्र संपन्न होईल. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून भरोसा महिला सेल, अमरावतीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती दिप्ती ब्रााम्हणे, क्राईम ब्राांच, अमरावतीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा दाताळकर व विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य डॉ. जयश्री धोटे उपस्थित राहतील.
तरी सर्वांनी राज्यस्तरीय कार्यशाळेला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, मातोश्री मुलींचे वसतीगृहाच्या अधीक्षक डॉ. मनिषा कोडापे व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले आहे.