LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

शरीरसुख नाकारल्यावर १९ वर्षीय मुलाने ३६ वर्षीय महिलेवर हल्ला केला

छत्रपती संभाजीनगर :- एका १९ वर्षीय मुलाने भावकीतल्याच ३६ वर्षीय महिलेवर, शरीरसुखाला नकार दिल्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असून, उपचारादरम्यान पीडितेला २८० टाके पडले आहेत. दरम्यान, १९ वर्षीय हल्लेखोर अभिषेक नवपुतेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय महिलेवरी अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून ही अत्यंत लांछनास्पद घटना समोर आली आहे. केवळ शरीरसुखाला नकार दिल्याने १९ वर्षांच्या तरुणाने जवळपास आपल्या वयाच्या दुप्पट असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चिखलठाणा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. १९ वर्षीय आरोपी अभिषेक नवपुते याने, भावकीतील एका ३६ वर्षीय महिलेजवळ शरीरसुखाची मागणी केली. तू नाहीतर तुझ्या भावजयीशी माझे शरीरसंबंध जुळवून दे अशी अभिषेकने मागणी केली. परंतु अभिषेकच्या या मागणीला कोणताही प्रतिसाद न देता पीडीत महिलेने फोन ठेऊन दिला. रविवारी संध्याकाळी पीडित महिला शेतातून घरी जात असताना चिडलेल्या अभिषेकने वाटेत तिला अडवले. आणि पुन्हा एकदा तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु तिने त्यास नकार दिला. त्यामुळे वाद घालत अभिषेकने तिचे केस ओढले आणि तिला मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत आणलेल्या कटरने तिच्यावर सपासप वार केले. महिलेच्या संपूर्ण चेहऱ्यावर तसेच, मांडीवर देखील वार करण्यात आले. एक वार तब्बल सव्वा दोन फुटाचा आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

पीडित महिलेवर छत्रपती संभाजीनगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या उपचारादरम्यान महिलेवर तब्बल २८० टाके घालण्यात आले आहेत. चिखलठाणा पोलिस स्थानकात सदर गुन्हा दाखल झाला असून, १९ वर्षांचा आरोपी अभिषेक नवपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!