अकोल्यात महामार्गावर भीषण अपघात! वेगवान ट्रकने उभ्या वाहनाला दिली जोरदार धडक!

अकोला :- अकोला शहर हादरलं! राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकने उभ्या वाहनाला जबर धडक दिली आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, हा अपघात पोलिसांच्या हद्दीत घडला असतानाही तब्बल एक तास पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत! काय आहे संपूर्ण घटना? पाहुया
या खास रिपोर्टमध्ये…
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठाजवळ एका टाटा एस वाहनाचा टायर पंचर झाला. वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टायर बदलण्याचे काम सुरू केले.याच दरम्यान, अमरावतीहून अकोलाकडे येणाऱ्या वेगवान आईचर ट्रकने टाटा एस वाहनाला जोरदार धडक दिली!
अपघात एवढा भयंकर होता की टाटा एस वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला.या अपघातात अमोल तवाळे गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा अपघात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला, पण प्रत्यक्षदर्शींनुसार, तब्बल एक तास उलटल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत!
गंभीर जखमी असलेल्या अमोल तवाळे यांना नागरिकांनी स्वतः रुग्णालयात हलवले. वाहतूक पोलिस आणि प्रशासन यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे! “अपघात झाल्यावर आम्ही पोलिसांना लगेच कळवले, पण एक तास कुणीच आला नाही!अखेर आम्हीच जखमीला रुग्णालयात नेलं!” असं प्रत्यक्षदर्शीन्नी सिटी न्यूज शी बोलतांना सांगितले.
“हे जर एखाद्या मोठ्या नेत्याच्या ताफ्यासोबत झालं असतं, तर पोलीस सेकंदात पोहोचले असते! पण सामान्य नागरिकांसाठी प्रशासन एवढं उदासीन का?”महामार्गावर वेग मर्यादा तोडून वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे!टायर पंचर झाल्यास वाहन चालकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे आणि वेगवान वाहनांपासून सावध राहावे.अपघातग्रस्त ठिकाणी प्रशासनाने सुरक्षा उपाय योजना करणे आवश्यक आहे!
भरधाव वेग आणि वाहतूक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे! प्रशासन केव्हा जागे होणार? नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना केव्हा घेतल्या जाणार? तुमच्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आम्हाला कळवा, आम्ही तुमचा आवाज बनू!