Amaravti GraminCrime NewsLatest News
अचलपूर-मेळघाटमध्ये शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर!

अचलपूर :- अचलपूर आणि मेळघाटच्या शेतकऱ्यांवर आज जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. सोयाबीन, तूर आणि कापसाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. सरकारच्या विविध योजना जरी सुरू असल्या तरी शेतकरी मात्र उपेक्षितच का? “लाडली झाली बहीण, लाडला झाला भाऊ… पण शेतकरी केव्हा होणार लाडला?” असा सवाल आता शेतकरी विचारत आहेत. आज आपण पाहणार आहोत या संतप्त शेतकऱ्यांचा संघर्ष आणि सरकारची भूमिका.
शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण तोच कणा मोडण्याच्या उंबरठ्यावर का? सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाहीत, तर हा संघर्ष आणखी तीव्र होईल. सरकारने शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा आणि तातडीने उपाययोजना कराव्यात. पुढील अपडेटसाठी पाहत राहा.