चांदुर बाजार येथे महाराष्ट्र ग्राम दर्पण अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
चांदुर बाजार :- चांदुर बाजार येथे दिनांक 6 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र ग्राम दर्पण, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गुरुकृपा मंगल कार्यालय ,चांदुर बाजार येथे संपन्न झालेल्या या प्रशिक्षणामध्ये गाव पातळीवरून पाणी शुद्धीकरण बाबत कार्य करणाऱ्या दोन महिलांचे प्रशिक्षण आयोजन केले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन मा.पाटील मॅडम (विस्तार अधिकारी पं. स.चांदुर बाजार), मा.जयश्री जयवार (उपसरपंच बेलमंडली), मा.भरती ताई मदने (ICRP), मा.प्रभाकर ती तिनखेडे (माजी विस्तार अधिकारी आरोग्य तथा प्रवीण प्रशिक्षक) , मा.शिवदास मुळे (माजी विस्तार अधिकारी पंचायत तसेच प्रवीण प्रशिक्षक) यांच्या हस्ते करण्यात आले. मा.पाटील मॅडम (विस्तार अधिकारी पं .स.चांदुर बाजार या शासकीय अधिकारी यांची प्रशिक्षण वर्गाला विशेष उपस्थिती होती. तसेच प्रणाली देशमुख मॅडम प्रशिक्षक आणि तिनखेडे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करून समारोप करण्यात आला . प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट प्रशिक्षण देण्याचे मनोगत प्रशिशार्थी यांनी व्यक्त केले.
सदर प्रशिक्षणामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पाणी गुणवत्ता विषयक अम्मलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्तेचे महत्व, पाणी गुणवत्ता विषयक ग्रामपंचायत व जलसुरंक्षक यांची जबाबदारी इत्यादी बाबींचा समावेश होता. या प्रशिक्षणामुळे शासनाचे पाणी गुणवत्ता विषयक धोरणाची माहिती मिळून ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी होईल. या उद्देशाने महाराष्ट्र ग्राम दर्पण, जलजीवन मिशन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष अंतर्गत पाणी गुणवत्ता विषयक प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन चांदुर बाजार येथे करण्यात आले होते.