नागपूरच्या यशोधरानगरमध्ये मोठी कारवाई! घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक!

नागपूर :- नागपुरातील यशोधरानगर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असताना,पोलिसांनी मोठ्या कारवाईत घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पहिल्या आरोपीला पकडले आणि त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला. या दोघांनी कपिलनगर आणि कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली आहे.पोलिसांनी आरोपींकडून एक वाहन आणि मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पाहूया संपूर्ण वृत्त…
यशोधरानगर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी चोरीची तक्रार दाखल झाली होती. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संशयित शेकारीब शेखर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताच आणखी एका आरोपीचे नाव समोर आले –प्रमोद उर्फ शिवम समग्र.यानंतर पोलिसांनी तातडीने दुसऱ्या आरोपीला अटक केली आणि दोघांकडून चोरीच्या घटनांची कबुली मिळवली.घरफोडीमध्ये चोरलेले मुद्देमाल आणि वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिस तपासात दोघांनी कपिलनगर आणि कळमना परिसरातही चोरी केल्याचे उघड झाले आहे. दोघांविरुद्ध आधीपासून गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. कळमना पोलीस ठाण्यात आरोपींबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुहास मधुकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली तपास गतीमान करण्यात आला आहे.
या टोळीचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि घराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. यशोधरानगर, कपिलनगर आणि कळमना परिसरातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहावे.
यशोधरानगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरी करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. मात्र, नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.