ब्रेकिंग न्यूज: दिवसाढवळ्या गॅरेज चालकाचा खून! रामनगर हादरले!

नागपूर :- दिवसाढवळ्या गॅरेज चालकाचा खून – संपूर्ण शहर हादरले! नागपूरच्या रामनगर भागात भरदिवसा एका गॅरेज चालकाची निर्घृण हत्या झाली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जागेच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेचा संपूर्ण तपशील पाहूया CITY NEWS च्या या विशेष रिपोर्टमध्ये…
रामनगरमध्ये गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर भरदिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला.ही घटना दुपारी 5:30 वाजता उघडकीस आली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा जागीच खून केला.पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्यासह अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्राथमिक तपासात जागेच्या वादातून हा खून झाल्याचे संकेत मिळत आहेत.संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, हत्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासत सुराग शोधण्यास सुरुवात केली आहे.गुन्हेगार फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
लवकरच आरोपींचा शोध लागेल, असे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले.दिवसाढवळ्या हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.लवकरच आरोपींना अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, असा पोलिसांचा दावा.नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण रामनगर हादरले आहे.आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील का? जागेच्या वादावरून हा खून झाला की यामागे काही वेगळे कारण आहे?हे सर्व तपासाअंती स्पष्ट होईल.