महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ बडनेरा येथे भव्य शांती मार्च

बडनेरा :- बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य शांती मार्च काढण्यात आला. भिक्खू संघाच्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ काढलेल्या या मार्चमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या संदर्भात अधिक माहिती देत आहे.
भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार, बडनेरा यांच्या नेतृत्वात शहरातून भव्य शांती मार्च काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मार्चची सुरुवात करण्यात आली. महिलांसह अनेक सामाजिक संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा होता. शेवटी बडनेरा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
बडनेरा शहरात मोठ्या प्रमाणात शांततेत हा शांती मार्च पार पडला. यामध्ये अनेक नागरिक, सामाजिक संघटना, महिला मंडळ आणि बौद्ध विहार संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पुढील घडामोडींसाठी पाहत रहा.