वाठोडा शुक्लेश्वर खोलापूर मार्गावर शेतातील धुराला भीषण आग, नागरिकांची धावपळ!

वाठोडा :- भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर – खोलापूर मार्गावर असलेल्या शेतात अचानक धुराला लागलेल्या आगीने नागरिकांमध्ये खळबळ उडवली आहे. घरं, गोठे आणि शेती यांना धोका निर्माण झाला असून, ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पावलं उचलली आहेत.
पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट…
भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर – खोलापूर मार्गालगत असलेल्या शेतात ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास धुराला अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरात नागरिकांची घरं, गुरांचे गोठे आणि चारा असल्याने मोठ्या नुकसानाचा धोका निर्माण झाला होता.
तत्काळ ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी घटनास्थळी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले. कर्मचाऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शेतामध्ये धुराला लागलेली ही आग मोठ्या संकटाला निमंत्रण देणारी ठरू शकते. सुदैवाने ग्रामपंचायतच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठे नुकसान टळले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही पाहत राहा City News.