AmravatiFestival NewsLatest News
होळीच्या रंगांची शहरात धामधूम!रंगपंचमीच्या तयारीला वेग, बाजारपेठा रंगीबेरंगी

होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि बाजारपेठांमध्ये याचा उत्साह दिसून येतोय. रंग, गुलाल, पिचकारी आणि मुखवट्यांची मोठी खरेदी सुरू आहे. चला जाणून घेऊया शहरातील ही रंगतदार तयारी.
शहरभर होळीचा जल्लोष सुरू झाला आहे. रुख्मिणी नगर आणि इतर भागांतील दुकाने रंगीबेरंगी सजली आहेत. विविध प्रकारच्या गन-पिचकार्या आणि आकर्षक गुलालांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालक आपल्या मुलांसाठी रंगपंचमी साहित्य खरेदी करताना दिसत आहेत. १३ मार्च रोजी होळी दहन तर १४ मार्चला धूलिवंदनचा उत्साह दिसून येणार आहे.
तर, या रंगपंचमीला तुम्ही कोणता रंग खेळणार आहात? बाजारपेठेत रंगांचा जल्लोष सुरू झालाय, आणि आता प्रत्यक्ष सणाची रंगत वाढणार आहे. आपल्या परिवारासोबत हा सण आनंदाने साजरा करा आणि होळीच्या रंगांनी जीवन रंगीत करा!