अमरावतीतील ऋतुंमभरा बोंडे यांची दुय्यम निबंधक पदावर निवड!

अमरावती :- महिला सशक्तीकरणाचे ज्वलंत उदाहरण ठरत, भातकुली तालुक्यातील कुंड येथील ऋतुंमभरा बोंडे यांनी मोठे यश संपादन केले आहे. जिल्हा निबंधक कार्यालय, अमरावती येथे त्यांची दुय्यम निबंधक (मूल्यांकन) या पदावर निवड झाली आहे. या यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चला पाहूया या विषयी सविस्तर रिपोर्ट!
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील ऋतुंमभरा बोंडे यांनी अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर दुय्यम निबंधक (मूल्यांकन) पद मिळवले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या सत्कार सोहळ्यात अविनाश पाटील ढोके सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी कुटुंबीय, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
हे यश केवळ ऋतुंमभरा बोंडे यांचे नाही, तर त्या सर्व महिला शक्तीचे आहे, ज्या कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात. त्यांचे यश हे नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच यशोगाथांसाठी पाहत राहा City News.