अर्धापूर पोलीस ठाण्यात महिला दिन विशेष! महिला पोलिसांनी सांभाळला ठाण्याचा पदभार
नांदेड :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अर्धापूर पोलीस ठाण्यात एक विशेष उपक्रम राबवण्यात आला.ठाण्याचा पूर्ण पदभार आज महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांभाळला. या विशेष कार्यक्रमात महिलांचा सन्मान करण्यात आला.
पाहूया हा खास रिपोर्ट!
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अर्धापूर पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराळे, पी.एस.आय. सुरेश भोसले, पी.एस.आय. मंगेश कोरे आणि पी.एस.आय. आयुब शेख यांच्या सहकार्याने हा विशेष कार्यक्रम पार पडला.
आजच्या दिवशी पोलीस ठाण्याचा पूर्ण पदभार महिला पोलिसांनी हाती घेतला. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्टेशन डायरी, सीसीटीनएस, वायरलेस, क्राईम चार्ज आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. महिला पोलीस कर्मचारी, महिला पोलिस पाटील, महिला पत्रकार आणि महिला होमगार्ड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि विशेष गिफ्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय महिलेचा देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, ठाण्यात आलेल्या इतर महिलांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या.
महिला सशक्तीकरणाचा हा सुंदर उपक्रम अर्धापूर पोलीस ठाण्यात पार पडला.महिलांनी ठाण्याचा संपूर्ण कारभार सांभाळत समाजाला एक नवा संदेश दिला. अशा सकारात्मक उपक्रमांसाठी CITY NEWS सोबत राहा.