नागपुरात किरकोळ वादातून हत्या – पोलिसांची जलद कारवाई

नागपूर :- नागपूरमध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंबाझरी भागातील रामनगर चौक येथे दुकान लावण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
चला पाहूया संपूर्ण अहवाल
नागपूरच्या अंबाझरी भागात एका किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी उमेश निकोसे यांच्या भावाचे रामनगर चौक येथे गॅरेज आहे, तर आरोपी किसन तिवारी याचे त्याच गॅरेजजवळ भाजीपाला दुकान आहे. दुकान लावण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू होता.”आरोपीने मनात राग धरून दिनांक ७ मार्च रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास, आपल्या साथीदार निलेश सरोदेच्या मदतीने विशाल निकोसे यांच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने गंभीर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल यांना तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने आरोपी किसन तिवारी आणि निलेश सरोदे यांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 296, 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी आधीपासूनच हा कट रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
नागपूरमध्ये दुकानाच्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेला आहे. पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असली, तरी अशा घटना टाळण्यासाठी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागपूरमधील गुन्हेगारीविषयी अधिक अपडेट्ससाठी CITY NEWS सोबत राहा.