नागपूरमध्ये दुचाकी चोरांचा पर्दाफाश! – पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर :- नागपुरात दुचाकी चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. कळमणा पोलिसांनी एका सराईत चोरासह त्याच्या साथीदाराला अटक करून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शक्य झाली आहे. चला पाहूया हाच स्पेशल रिपोर्ट.
नागपुरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, कळमणा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत चोरांचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, चिखली लेआउट, व्ही.सी.ए. क्रिकेट ग्राउंडजवळ एक संशयित व्यक्ती आहे, ज्याच्याजवळ चोरीच्या गाड्या आहेत.” पोलिसांनी रिषभ असोपा या सराईत गुन्हेगाराला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याने सांगितले की, चोरी केलेली अॅक्टीवा गाडी पेट्रोल संपल्याने चिखली येथील RTO कार्यालयाजवळ उभी केली होती. तसेच त्याच्या साथीदार देवेंद्र उर्फ बब्बू दुबेलेच्या मदतीने शहरातील पारडी, लकडगंज आणि नंदनवन हद्दीतून आणखी पाच दुचाक्या चोरल्या होत्या.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आणखी चोरीच्या गाड्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. आरोपी रिषभ असोपा हा याआधीही अनेक पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत अडकलेला आहे.
नागपुरातील दुचाकी चोरीचं मोठं रॅकेट पोलिसांनी यशस्वीपणे उद्ध्वस्त केलं आहे.मात्र, अजूनही या प्रकरणात आणखी आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पुढील तपास सुरूच आहे. नागपुरातील गुन्हेगारीविषयी अधिक अपडेट्ससाठी CITY NEWS NAGPUR सोबत राहा. पोलिसांनी ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे केली असून आरोपींनी आणखी काही चोरीचे गुन्हे केल्याची शक्यता आहे.