पोलीस भरतीसाठी जोरदार तयारी – अमरावतीच्या मैदानावर उमटले जिद्दीचे पाऊल!

अमरावती :- अमरावतीतील पोलीस भरतीसाठी युवक-युवतींमध्ये असलेला जोश आणि तयारी. काहीच महिन्यांत पोलीस भरती होणार असल्यामुळे शेकडो तरुण सकाळ-संध्याकाळ मैदानात घाम गाळत आहेत. आमचे प्रतिनिधी अजय श्रुंगारे यांनी थेट जिल्हा नेहरू स्टेडियमवर जाऊन हा संपूर्ण आढावा घेतला आहे.
चला पाहूया स्पेशल रिपोर्ट
पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न असणाऱ्या शेकडो युवक-युवतींमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अमरावतीतील जिल्हा नेहरू स्टेडियमवर सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात तरुण मैदानावर सराव करत आहेत. यामध्ये १०० मीटर धावणे, ८०० मीटर रनिंग, लांब उडी, गोळाफेक यासारख्या शारीरिक चाचण्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील तसेच परजिल्ह्यातूनही अनेक तरुण-तरुणी येथे येऊन सराव करत आहेत.
युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अनेक शारीरिक ट्रेनर त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पोलीस भरतीमध्ये प्रथम कागदपत्र तपासणी, उंची मोजमाप आणि नंतर मैदानी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या सर्व चाचण्यांसाठी उमेदवार जोरदार सराव करत आहेत.
स्पर्धा अधिक तीव्र असल्यामुळे शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेचीही तयारी जोरात सुरू आहे. अमरावतीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे देखील यासाठी विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.
अमरावतीतील पोलीस भरतीसाठी असलेली तयारी आपण पाहिलीच. स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मेहनतही तितकीच वाढली आहे. सराव करणाऱ्या या तरुणांना CITY NEWS कडून शुभेच्छा!