ब्रेकिंग न्यूज | नागपूरमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा!

नागपूर :- नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने अंबाझरी परिसरातील पब्लिको कॅफेवर छापा टाकत मालक आणि मॅनेजरला अटक केली. जप्त मुद्देमाल पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
संपूर्ण प्रकरण काय आहे ते पाहूया!
नागपूर शहरात अवैध हुक्का पार्लरचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर, युनिट क्रमांक 2 च्या पोलिसांनी अंबाझरी परिसरातील “पब्लिको कॅफे” वर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 15 हुक्का पॉट आणि मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले. एकूण 39,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे:
१ विकास राजू डागोर (31 वर्षे) – कॅफेचा मालक,
२ नवनीत शंकर वरखडे (27 वर्षे) – कॅफेचा मॅनेजर यांना अटक कार्नाय्त आली आहे.
अंबाझरी पोलीस ठाण्यात कलम 4(1)(21) आणि 5(1)(21) कोटपा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नागपूरमध्ये अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, नागपुरात सर्रास चालणाऱ्या अशा हुक्का पार्लरना कायमचे बंद करण्याची मागणी केली आहे.