महिलादिनानिमित्त मोर्शीमध्ये वाचनालयाचे उद्घाटन
मोर्शी :- महिलादिनानिमित्त मोर्शी शहरात एका नव्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. भारतीय महाविद्यालय मोर्शी आणि स्थानिक महिला उद्योजिकांच्या सहकार्याने महिलांसाठी विशेष वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना वाचनाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. चला, जाणून घेऊया या कार्यक्रमाविषयी अधिक!
मोर्शी शहरातील प्रसिद्ध महिला उद्योजिका आणि भारतीय महाविद्यालय मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. निधी अमर कुमार पेठे यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. लाजवंती टेंभुर्णे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ऋतुजा सागर, अपर्णा नवीन कुमारजी पेठे यांचा सहभाग लाभला. तसेच खोडसकर ज्वेलर्सच्या मीनाताई खोडसकर, डॉ. दिपाली सावंत देशमुख, वैशालीताई मगरदे, पूनमताई मोहोळ यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
या वाचनालयाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध होणार असून, हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.
महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी असे उपक्रम राबवले जाणे ही समाजाच्या प्रगतीची निशाणी आहे. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी भारतीय महाविद्यालय मोर्शी आणि महिला उद्योजिकांनी घेतलेली ही पुढाकार कौतुकास्पद आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा City News .