वॉकथॉनमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान
अमरावती :- जिल्हा प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित वॉकथॉनमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच समारोपीय कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करण्यात आला.
विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, डॉ. मोनिका कटियार, विभागीय महिला बालकल्याण अधिकारी विलास मसराळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन वॉकथॉनला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल, इर्विन चौक, मदर टेरेसा मार्ग, गर्ल्स हायस्कूल चौक, शिवाजीनगरमार्गे परत विभागीय क्रीडा संकुल स्टेडियम रॅलीचा समारोप करण्यात आला. वॉकथॉनमध्ये महिला सुरक्षा आणि स्त्री-पुरुष समानता याबाबत जनजागृती करण्यात आली. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत सुप्रिया गजभिये, सुषमा वानखडे, प्रणिता तागडे, सीमा कोरडे, शामू दारसिंबे, सरिता किल्लेदार, निकिता पवार, जयश्री मानकर, वर्षा वानखडे, नीलाक्षी दर्यापूरकर, मनीषा टवलारे, स्वामिनी तायडे, ईश्वरी गांजरे, मनोरमा गायकवाड, रेणूका सपाटे, छाया काळमेघ यांचा सत्कार करण्यात आला.