स्टेट बँकेचं महिलांसाठी खास गिफ्ट! आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार लोन

स्टेट बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या नवीन अस्मिता लोन योजनेत महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे.
आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी स्टेट बँकेने मोठी घोषणा केली आहे. स्टेट बँकेने महिलांसाठी खास नवीन योजना राबवली आहे. स्टेट बँकेने अस्मिता या नावाने कर्जाची योजना राबवली आहे. या योजनेत तुम्ही कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन घेऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही नवीन योजना राबवण्यात आली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे लोन दिले जाते. जेणेकरुन या लोनमधून त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करु शकतात. यामुळे महिला इतरांनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन देऊ शकतात.
अस्मिता लोन योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.यामध्ये कोणत्याही गॅरंटीशिवाय लोन दिले जाणार आहे. याचसोबत व्याजदरदेखील कमी आकाराले जात आहे. याचसोबत रुपे नारी शक्ती डेबिट कार्डदेखील लाँच केले आहे.
स्टेट बँकेच्या या योजनेमुळे महिलांना खूप फायदा होणार आहे. महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या योजनेत लोन घेताना तुम्हाला कोणतीही गॅरंटी द्यावी लागणार नाही. तसेच व्याजदर कमी असल्याने हप्ता भरण्यासदेखील काही अडचणी येणार नाही.
स्टेट बँकेने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिला स्वतः पुढाकार घेऊन व्यवसाय सुरु करतील, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.