१० लाख रुपये न दिल्यास गोळ्यांनी भूनण्याची धमकी!

अमरावती :- अमरावतीत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. १० लाखांची खंडणी न दिल्यास गोळ्यांनी भूनण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
यावरजमील कॉलनीत राहणाऱ्या हाजी इरफान खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ४ मार्च रोजी त्यांना एका व्यक्तीचा कॉल आला. ‘मी संघटना चालवतो, पोलिस कमिशनर सुद्धा माझ्यापासून घाबरतात,’ असे सांगत फिर्यादीकडे १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास गोळ्यांनी भूनण्याची धमकी दिली. या घटनेनंतर ७ मार्च रोजी नागपुरी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या तक्रारीनंतर आरोपी रहेमत खान वल्द बिस्मिल्ला खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरी गेट पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अमरावतीत हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News