अमरावती मेडिकल कॉलेजवर सिटी न्यूजचा विशेष कव्हरेज

अमरावती :- चला, सिटी न्यूजच्या विशेष कव्हरेजमध्ये आपण निघूया अमरावतीत नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजकडे – अमरावती मेडिकल कॉलेज! सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाची नवी सुरुवात झाली आहे. NEET परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, 100 विद्यार्थी MBBS शिक्षण घेत आहेत.
चला जाणून घेऊया या कॉलेजची कार्यप्रणाली, विद्यार्थ्यांचा खर्च, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुढील योजना, थेट कॉलेजच्या डीन आणि विद्यार्थ्यांकडून. सिटी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट सुरू करूया!
12 जुलै 2024 रोजी अमरावती मेडिकल कॉलेजला सरकारची अधिकृत मान्यता मिळाली. यानंतर, NEET परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि 100 विद्यार्थ्यांनी MBBS अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.
वैद्यकीय शिक्षणाची एकूण कालावधी 4.5 वर्षे असेल. यात पहिली तीन वर्षे अभ्यास, दीड वर्ष प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि एक वर्ष सरकारी रुग्णालयात सेवा बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांना 2.5 लाख रुपये खर्च करावा लागेल.
सध्या, 24 डॉक्टर आणि प्राध्यापक कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. याशिवाय, तात्पुरते आणि कायमस्वरूपी कर्मचारीही सेवेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शरीरशास्त्र (Autonomy) अभ्यासासाठी 4 मानवी शव कॉलेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 6 टेबलांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. किशोर इंगोले यांनी सिटी न्यूजच्या टीमला संपूर्ण इमारतीचा दौरा घडवून आणला आणि कॉलेजच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली.
डॉ. इंगोले म्हणाले की, ‘कॉलेजची कार्यप्रणाली सुरळीत चालू आहे. काही त्रुटी आहेत, ज्या लवकरच दूर केल्या जातील.
450 बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी 403 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच, भारतीय वैद्यकीय परिषदेकडून कॉलेजला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
सिटी न्यूजने मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्यांनी आपली स्वप्ने आणि अनुभव शेअर केले.