जागतिक महिला दिवस सिटी न्यूज कार्यालयात उत्साहात साजरा

City News office :- आज जागतिक महिला दिनानिमित्त सिटी न्यूज कार्यालयात महिला सशक्तीकरणाचा उत्सव साजरा करण्यात आला. मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सिटी न्यूज परिवाराने विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. चला पाहूया याचा संपूर्ण अहवाल.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिटी न्यूज परिवाराने महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. मीडिया क्षेत्रात महिलांची भूमिका मोलाची आहे, आणि त्याचाच गौरव करण्यासाठी सिटी न्यूज कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सिटी न्यूज प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतीया यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. चंदू सोजतीया यांनी महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. मीडिया क्षेत्रातही महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, सिटी न्यूज परिवार त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत आहे.”
कार्यक्रमात सिटी न्यूजच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवांचे आणि महिला सशक्तीकरणाविषयी विचार व्यक्त केले.
महिला सशक्तीकरणाचा संदेश देत सिटी न्यूज परिवाराने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला. मीडिया क्षेत्रातील महिलांच्या कार्याचा सन्मान करून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.