जाणून घ्या IND vs NZ फायनल मॅचची संभाव्य Playing 11

IND vs NZ :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज, 9 मार्च, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. आज टीम इंडिया 25 वर्षांपूर्वी किवीजकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 2000 मध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते, तेव्हा खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या २५ वर्ष जुन्या पराभवाचा बदला किवीजकडून घेण्यासाठी आता भारतीय संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत.
दुसऱ्यांदा भारत जिंकला ही ट्रॉफी
भारतीय संघ सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2013 मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा हा ट्रॉफी जिंकला होता, तर 2017 मध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण आता टीम इंडियाची नजर तिसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावण्याकडे आहे. भारताने स्पर्धेच्या नवव्या सिजनमध्ये आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत आणि आता अंतिम टप्प्यात न्यूझीलंडला हरवायचे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या सर्वात मजबूत प्लेइंग-11 ला मैदानात उतरवली जाईल. चला जाणून घेऊयात टीम इंडिया आणि संभाव्य प्लेइंग इलेव्हन..
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल ओरुक.