नॅशनल टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन मध्ये कु.अधिरा तायडे देशातून तृतीय..

अमरावती :- विद्यार्थ्यामधील अंगीभूत अभिक्षमता व त्यांच्यातील प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय प्रतिभा शोध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रतिभावान विद्यार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या या स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी होत असून प्रावीण्याप्रत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यावर्षीच्या १४ व्या नॅशनल टॅलेंट सर्च ड्रॉईंग अँड पेंटींग कॉम्पिटिशन २०२४-२५ मध्ये अमरावतीच्या कु. अधिरा सुयोग तायडे हिने सहभागी होऊन चित्रकला व रंगभरण स्पर्धेत देशातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यासाठी अधिरा ला मेडल,प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कु.अधिरा सुयोग तायडे ही सेंट झेवियर्स कॅथ्रेडियल स्कूल अमरावती मधील वर्ग ४ थी ची विद्यार्थिनी असून तिचे स्पर्धेत चित्रकला व रंगभरण च्या माध्यमातून आपल्या प्रतिभेचं दर्शन घडविले आहे. या बद्दल तिचे प्रिन्सिपल फादर रमशीन, सिस्टर रेबेका, वर्गशिक्षिका धनश्री मिस, चित्रकला शिक्षक रीनालिनी मिस, सोनाली सुयोग तायडे यांनी अभिनंदन केले आहे. कु.अधिरा तायडे हिला चित्रकलेची प्रचंड आवड असून तिने विविध शालेय स्तरावरच्या चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन अनेक आपल्या कल्पकतेतून विविध चित्रे रेखाटले आहे. आता तिने देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्यप्राप्त केल्याने अधिरा तायडे हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.