बडनेरा रोड अमरावतीत श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघाच्या वतीने नवीन भोजनशाला आणि आतिथ्य परिसराचे उद्घाटन
अमरावती :- अमरावतीच्या बडनेरा रोडवरील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने उभारलेल्या नवीन भोजनशाला आणि आतिथ्य परिसराचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. अभय कुमार, अरविंद कुमार, अरुण कुमार, अतुल कुमार, चेतन कुमार कोटेचा परिवाराच्या सहकार्याने बांधण्यात आलेली ही भोजनशाळा समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे. या विशेष सोहळ्याला मान्यवर उपस्थित होते, तसेच श्रमण संघीय परम पूज्य अरूणप्रभाजी महाराज साहेब व परम पूज्य मोक्षरत्नाजी महाराज साहेब यांच्या प्रवचनाने उपस्थितांना आध्यात्मिक व सामाजिक संदेश मिळाला. चला, पाहूया या भव्य सोहळ्याचा संपूर्ण अहवाल.
अमरावतीतील बडनेरा रोड येथे श्री वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भोजनशाला आणि आतिथ्य परिसराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कोटेचा परिवाराच्या सहकार्याने साकारलेली ही भोजनशाळा समाजसेवेसाठी समर्पित करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याला उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कमलकिशोर तातेड, तसेच पूर्व न्यायाधीश व महाराष्ट्र फीस रेगुलेशन अथॉरिटीचे चेअरपर्सन विजयजी आचलिया उपस्थित होते. नागपूरचे उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.
यावेळी श्रमण संघीय परम पूज्य अरूणप्रभाजी महाराज साहेब यांनी आपल्या प्रवचनातून धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश दिला. तसेच भोजनशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान सिटी न्यूज चॅनेलचे प्रबंध संपादक आणि श्री वर्धमान स्थानवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष डॉ. चंदू सोजतीया लिखित ‘श्रीलाल शुक्ल के उपन्यासो मे सामाजिक राजनीतिक चेतना’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच यावेळी श्री वर्धमान स्थानवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अमृत मुथा,सचिव धर्मेंद्र मुणोत, उपाध्यक्ष डॉक्टर चंदू सोजतीया उपाध्यक्ष अनिल कोठारी कोषाध्यक्ष प्रकाश बैद, सहसचिव गिरीश मरलेचा, सुदर्शन चोरडिया, प्रकाश बोकडिया, अशोक खाबिया, संजय मुनोतव महेंद्र गुगलिया सह कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
हा भव्य उद्घाटन सोहळा जैन समाजाच्या एकतेचे आणि सामाजिक सेवाभावनेचे उत्तम उदाहरण आहे. कोटेचा परिवाराच्या सहकार्याने उभारलेल्या या भोजनशाळेचा लाभ अनेकांना होईल. तसेच आजच्या कार्यक्रमात मिळालेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक संदेशाने उपस्थितांना प्रेरणा मिळाली. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.