अमरावतीतील दिव्य सदन सोशल सेंटरच्या बाल पंचायतने शहरात केला अभ्यास दौरा.

अमरावती :- अमरावतीतील दिव्य सदन सोशल सेंटरच्या बाल पंचायतने घेतलेल्या अभ्यास दौऱ्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संवाद साधत या बाल मंत्र्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
पाहूया ही सविस्तर बातमी :
अमरावतीतील दिव्य सदन सोशल सेंटर गेल्या ४८ वर्षांपासून सामाजिक कार्य करत असून, शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत आहे. या अंतर्गत, बाल पंचायतने शहरातील विविध भागांचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली.
जिल्हाधिकारी कटियार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले आणि यशस्वी होण्यासाठी काही मौल्यवान टिप्स दिल्या. या वेळी दिव्य सदन सोशल सेंटरच्या संचालिका रोजलीन सिस्टर, प्रकल्प समन्वयक अक्षय आठवले, अमित धंदर आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते.
दिव्य सदन सोशल सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. असेच महत्त्वाचे सामाजिक विषय आणि घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील City News वर. आम्ही पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह.