अमरावती विमानतळावरून थेट प्रवासी सेवा सुरू – 31 मार्चपासून उड्डाणे, विदर्भाच्या भविष्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट!

अमरावती :- 31 मार्च 2025… हा दिवस अमरावतीकरांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे! कारण या दिवसापासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमाने उड्डाण घेणार आहेत! उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत ही बातमी जाहीर केली आहे! काय आहे संपूर्ण अपडेट? कोणते मार्ग सुरू होणार? हे पाहण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा!
31 मार्च 2025 – हा दिवस अमरावतीकरांसाठी नवीन आशा आणि विकास घेऊन येणार आहे! कारण या दिवसापासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमाने उड्डाण घेणार आहेत! हे ऐकताच अमरावतीकरांसाठी ही आश्चर्याची आणि आनंदाची बातमी ठरली आहे! कारण या विमानतळाच्या उड्डाणांसाठी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती!
अर्थसंकल्पात या महत्त्वाच्या घोषणेची अधिकृत घोषणा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, जे अमरावती आणि संपूर्ण विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा गेमचेंजर ठरेल! “या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आता 1800 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे 72 सीटर विमाने सहज उतरणार आहेत! यामुळे हवाई प्रवास सुलभ आणि वेगवान होईल!
मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी हवाई संपर्क होण्यामुळे व्यापाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे! कृषी क्षेत्रातील उत्पादनांची हवाई वाहतूक सहज होणार, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे! प्रवासाचा वेळ वाचणार, वाहतुकीस गती मिळणार, आणि महत्त्वाचे म्हणजे अमरावतीच्या पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना बळ मिळणार!
31 मार्चपासून हवाई प्रवास सुरू होत आहे आणि संपूर्ण विदर्भाच्या विकासासाठी हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे! विदर्भाच्या भविष्यासाठी ही संधी किती महत्त्वाची आहे, हे आपण लवकरच पाहणार आहोत! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.