चॅम्पियन्स ट्रॉफी १२ वर्षांनी पुन्हा एकदा भारतात!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने न्यझीलंडवर शानदार विजय मिळवला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड या 2 बलाढ्य टीममध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. जिथे न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. कॅप्टन रोहितने शर्माने टीमला एक चांलगी सुरुवात करुन दिली. अवघ्या 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत न्यूझीलंड विरोधात 25 वर्षे जुना बदला घेतला.2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडकडून हरल्याने टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वप्न भंगले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची टीम इंडियाची ही तिसरी वेळ आहे. याआधी 2002 साली सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा त्यानंतर 2025 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारताने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. 2017 मध्ये भारत अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारताने जिंकले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने 49 षटकांत 6 गडी गमावून 254 धावा केल्या आणि सामना तसेच स्पर्धा जिंकली.
सहाव्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली
भारताने सहाव्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. 1983 चा एकदिवसीय विश्वचषक, 2007 चा टी20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक, २०१३ चा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2024 चा टी20 विश्वचषक या नंतर भारताने आणखी एक जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये गेल्या वेळी टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाली होती. बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून त्यांनी टी-20 विश्वचषक जिंकला. आता रोहितच्या नेतृत्वाखालील हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे.
टीम इंडियासमोर न्यूझीलंडकडून 251 धावा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत किवी संघाची सुरुवात फारशी फारशी चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसह, भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली आणि नियमित अंतराने यश मिळवले.
डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी किवी संघासाठी निश्चितच काही वेळ क्रीजवर घालवला. दोघांनीही न्यूझीलंडकडून अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी गोलंदाजीत आपली हुशारी दाखवली आणि प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. अशाप्रकारे टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत न्यूझीलंडला फक्त 251 धावांवर रोखले.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव केला. भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. या खास प्रसंगी, सिनेकलाकारांनीही टीम इंडियाला विजयाबद्दल अभिनंदन केले आणि या विजयाचे सेलिब्रेशन केले:
अजय देवगणने लिहिले- घरातील वातावरण अजूनही तसेच आहे
अजय देवगणने ‘कभी खुशी कभी गम’ मधील त्याची पत्नी काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, ‘आमच्या घरात आजही तेच वातावरण आहे. टीम इंडियाचे अभिनंदन.
विवेक ओबेरॉयने दाखवला सेलिब्रेशनचा मूड
विवेक ओबेरॉयने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारताच्या विजयानंतर स्टेडियममधील वातावरण दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यासोबत त्याने लिहिले, ‘ओये होये!’ २५ वर्षांची प्रतीक्षा संपली! आज रोहितच्या सिंहांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याचा हिशोब चुकता केला. मित्रांनो, ही ट्रॉफी आपल्या हक्काची होती आणि टीम इंडियाने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर भारतातील लोकांची मनेही जिंकली आहे. रोहित शर्माने नेहमीप्रमाणे एक आदर्श ठेवला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्वाधिक विजयाचा विक्रम आता टीम इंडियाच्या नावावर आहे. माझा भारत महान, जय हिंद.