भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा अमरावतीत जल्लोष

अमरावती :- भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली आहे! हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला.भारताच्या या दिमाखदार विजयाचा आनंद अमरावतीकरांनी उत्साहात साजरा केला. शहरातील राजकमल चौक, राजापेठ, चपराशीपुरा, पंचवटी आणि इर्विन चौक येथे चाहत्यांनी जल्लोष केला.
भारताने न्यूझीलंडवर 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडला 251 धावांत रोखले.
प्रत्युत्तरात, टीम इंडियाने 252 धावांचा पाठलाग शानदार पद्धतीने पूर्ण केला. कर्णधार रोहित शर्माने आक्रमक खेळी करत 89 धावा केल्या आणि संघाला सहज विजय मिळवून दिला.हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला. राजकमल चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. टीम इंडियाच्या समर्थनार्थ ‘भारत माता की जय’ आणि ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर अमरावतीत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा! अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा सिटी न्यूज .