मा.अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांनी दिली महानगरपालिकेला भेट
अमरावती :- मा.अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांनी अमरावती महानगरपालिकेला भेट दिली. मा.अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांनी अमरावती महानगरपालिकेला भेट दिल्याबद्दल त्यांचा यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला.
अमरावती महानगरपालिकेत मा.अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यात अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती, भरती अनुशेष सेवा ज्येष्ठतेनुसार सरळ भरतीचे अनुशेष, अवैध पदोन्नती आणि अनुसूचित जाती-जमातीच्या योजनांचा किती कर्मचारी आणि महानगरपालिका क्षेत्रातील लोकांना लाभ मिळतो, या विषयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मा.अॅड. धर्मपाल मेश्राम उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) महाराष्ट्र राज्य, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांनी महानगरपालिकेतील विविध विभागांच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. सदर विभागांच्या अधिका-यांशी चर्चा करुन कामकाजाबाबत माहिती घेवून त्यांना निर्देशित करण्यात आले.
हॉस्पीटलची वर्गवारी करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या. संपुर्ण हॉस्पीटलची फायर तपासणी बाबत माहिती जाणुन घेतली. अनधिकृत मोबाईल टॉवर बाबत माहिती जाणून घेवून त्याबाबत मार्गदर्शन केले. होर्डींग्ज बाबत सद्याची स्थिती जाणून घेवून त्यावर त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. लाड पागे समितीनुसार केलेल्या संपुर्ण कार्यवाहीचे पाहणी यावेळी त्यांनी केली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चव्हाण, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उपअभियंता नितीन बोबडे, जयंत काळमेघ, राजेश आगरकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.