राज्याच्या अर्थसंकल्पावर खासदार बळवंत वानखडे यांची टीका

अमरावती :- राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाला, मात्र काँग्रेस पक्षाचे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी या बजेटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या मोठ्या आश्वासनांची पूर्तता या बजेटमध्ये झाली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांसाठी २१०० रुपये सन्मान निधी यांसारख्या योजनांची घोषणा अपेक्षित होती, मात्र या सर्व घोषणा केवळ फसवणुकीच्या पातळीवर राहिल्या, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.
बाईटमध्ये ते म्हणतात: हे बजेट म्हणजे सामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसणारं आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार युवक, उद्योगधंदे यांच्यासाठी कोणत्याही ठोस योजना नाहीत. सरकारनं निवडणुकीच्या आधी मोठी आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात बजेटमध्ये ती कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे हे बजेट अपयशी आहे! बळवंत वानखडे, खासदार, अमरावती: – बाईट
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी या बजेटला अपयशी बजेट असल्याचं म्हटलं आहे. सामान्य जनतेच्या फायद्यासाठी या बजेटमध्ये काहीही नाही, असा त्यांचा आरोप आहे. आता या टीकेला सरकार कसा प्रतिसाद देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल