Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
१६ वर्षीय युवकाचा डोहात बुडून मृत्यू

यवतमाळ :- बाभुळगाव तालुक्यातील कोटंबा येथे दुर्दैवी घटना घडली असून, तथागत विद्यालयातील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा डोहात बुडून मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यातील महाडोळी येथील गोकुल मेश्राम (१६) हा सध्या कोटंबा येथील तथागत विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. मंगळवारी दुपारी तो आपल्या मित्रासोबत शाळेसमोरच्या नाल्यावर गेला. यावेळी तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि अखेर गोकुलचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, गोकुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.