अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल… पाच जिल्ह्यांसाठी संजीवनी!

अमरावती :- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया मोफत असल्या तरी, त्या करणारे डॉक्टर मात्र सहा महिन्यांपासून वेतनाशिवाय काम करत आहेत! डॉक्टरांचे सात कोटी रुपये थकीत आहेत. त्याचबरोबर, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पाच महिने झाले तरी पगार मिळालेला नाही! सक्षम फॅसिलिटी प्रा. लि., स्वास्तिक प्रायव्हेट लिमिटेड आणि अमरावती नागरिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पगार देण्यास टाळाटाळ केली आहे.
आमदार सुलभा खोडके यांची विधानसभेत मागणी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुलभा खोडके यांनी हा मुद्दा लावून धरला. त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १० कोटी रुपये निधी मागितला आणि भविष्यात स्वतंत्र बजेट देण्याची मागणी केली. तसेच, फेज-३ अंतर्गत नवीन विभाग सुरू करण्यासाठीही शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि हजारो रुग्णांवर उपचार होत आहेत. मात्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना वेतनच मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. हा प्रश्न कधी आणि कसा सुटेल? निधी मिळेल का? हा अन्याय संपेल का? याचं उत्तर लवकरच मिळेल.