अवैध वाळू ट्रकचा ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक – एक ठार, एक गंभीर

अमरावती, दर्यापूर :- अमरावती – दर्यापूर राज्य मार्गावर खोलापूर जवळ अवैध वाळू वाहतुकीमुळे एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव मिनी ट्रकने कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
पाहूया सविस्तर रिपोर्ट…
१० मार्च रोजी सायंकाळी सुमारास हा अपघात घडला. अवैधरित्या वाळू घेऊन जाणारा मिनी ट्रक अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडकला. या अपघातात दोन्ही वाहने पलटी झाली असून, मोठे नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॉली चुरडल्यासारखी दिसत असून, ही घटना अतिशय भयावह आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने अशा अवैध वाळू वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अवैध वाळू वाहतुकीमुळे अपघाताची ही मालिका थांबायचं नाव घेत नाही. या अपघातात एका निष्पाप शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन या अवैध वाळू वाहतूकदारांवर काय कारवाई करते. अजूनही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत, पण कारवाईचा वेग मात्र मंद आहे. पुढील तपास सुरू असून, आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. City News.