गोंदित्य – नक्षलग्रस्त भागात भव्य मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन!

गोदीया :- आज राज्य राखीव पोलीस बलाच्या वर्धापन दिनानिमित्त गोंदियामध्ये एक महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य कॅम्प आणि शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. चला, याबाबत सविस्तर पाहूया.
राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक 15 आणि भारत राखीव बटालियन 3 यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया येथे महाआरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आला. जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. समादेशक अमोल गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित या कॅम्पमध्ये विशेषतः नक्षलग्रस्त भागातील गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
435 नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला, तर 58 रुग्णांना अधिक उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. तसेच, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 98 जवानांनी रक्तदान केले. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
तर हा होता गोंदियामधील एक स्तुत्य सामाजिक उपक्रम, जिथे गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा city news.