Amaravti GraminCrime NewsLatest News
चांदुररेल्वे येथील नितेश मेश्राम मृत्यू प्रकरण : आयोगाची कठोर भूमिका

चांदुररेल्वे :- चांदुररेल्वे येथे नितेश मेश्राम यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचे निर्देश दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, तसेच मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, असे आदेश सामाजिक न्याय विभागाला देण्यात आले आहेत. सोबतच, अट्रॉसिटी गुन्ह्यांची वाढ करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणात आयोगाने दिलेले निर्देश आणि सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिसादाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. पुढील घडामोडींसाठी जोडले राहा City News सोभात.