चांदूरबाजार येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

चांदूरबाजार :- महिला सशक्तीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम नमुना चांदूरबाजार येथे पाहायला मिळाला, जिथे पत्रकार मित्र परिवार आणि गंगामाई व्यायाम प्रसारण मंडळाने संयुक्तरित्या गरजू महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमात अनाथ दिव्यांग मुलींना ड्रेस तर विधवा महिलांना साडी वाटप करण्यात आले.
पाहूया हा संपूर्ण अहवाल….
संत नामदेव महाराज सांस्कृतिक भवन, चांदूरबाजार येथे झालेल्या या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. गौतम खंडारे, संदीप वानखडे, राहुल कविटकर, इमरान खान आणि गंगामाई व्यायाम प्रसारण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कठाणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष ज्ञानेश्वर धाने पाटील (माजी आमदार, बडनेरा) तर उद्घाटक म्हणून प्रशांतजी गायकवाड (गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, बेटी बचाव बेटी पढाव) उपस्थित होते. नंदाताई अभ्यंकर, शिल्पाताई कुडवे, स्टेला मॅडम, गजानन पेठे, पुष्पक खापरे, समीक्षा बेलारवार, आशा खान यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. पत्रकार क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील या वेळी उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे तालुक्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला सशक्तीकरणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज आहे. गरजू आणि वंचितांसाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. चांदूरबाजारमधील या आगळ्या-वेगळ्या महिला दिन कार्यक्रमाने निश्चितच समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. पुढील वर्षी असेच उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवले जातील, अशी अपेक्षा!