जय किसान फायनान्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल!

यवतमाळ :- शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाचा पैसा लुटणाऱ्या जय किसान फायनान्स कंपनीवर गुन्हा दाखल! १६० शेतकऱ्यांना तब्बल ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या या कंपनीचा संचालक फरार आहे. काय आहे नेमके हे प्रकरण?
पाहुया आमचा हा विशेष रिपोर्ट…
दारव्हा शहरात जय किसान मायक्रो फायनान्स कंपनीने २०२४ मध्ये कार्यालय थाटले. कमी व्याजदरात कर्ज मिळेल असे सांगत शेतकऱ्यांना आमिष दाखवले. मात्र, लोन प्रोसेसिंग फी, जीएसटी, डाउन पेमेंटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आली. अखेर फेब्रुवारीत शेतकऱ्यांनी पैसे मागितल्यानंतर संचालक प्रशांत खरे दस्तऐवज घेऊन पसार झाला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून आरोपींच्या शोधात आहेत.
शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा परत मिळेल का? आरोपींना कधी अटक होईल? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि सामाजिक बातम्यांसाठी पाहत राहा City News.