जिल्हा परिषद कार्यालय परिसरात सुका कचऱ्याचे ढीग, मोठ्या दुर्घटनेची शक्यता!

अमरावती :- आज आपण एक गंभीर विषय उचलणार आहोत. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात साचलेल्या सुका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे मोठा अग्नितांडव होऊ शकतो! उन्हाळ्यात आगीच्या घटना वाढतात, आणि जर येथे चुकूनही एक ठिणगी पडली, तर मोठे नुकसान होऊ शकते. प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर हे गंभीर ठरू शकते. चला, बघुया सविस्तर रिपोर्ट.”
ही आहेत त्या ठिकाणची थरारक दृश्यं! जिल्हा परिषद कार्यालयाच्या मागे मोठ्या प्रमाणात सुका कचरा टाकला जात आहे.बांधकाम विभागाच्या मागे ट्रकभर कचरा साचलेला दिसतोय, आणि प्रशासन डोळेझाक करतंय! इथेच आहे विद्युत विभागाचे उपकेंद्र, आणि शेजारीच अनेक नादुरुस्त वाहनेही पार्क केलेली आहेत. जर अचानक आग लागली, तर काय होईल?
सामान्य नागरिक, लहान मुलं सेतू केंद्रात मोठ्या संख्येने जातात. अशा परिस्थितीत आग लागली तर कोण घेईल जबाबदारी? मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदांसाठी दिलेल्या कार्यक्रमात सुधारणा करण्याचा उल्लेख केला होता, पण प्रत्यक्षात परिस्थिती बघितली, तर ते फज्जा ठरत आहे.
तर पाहिलंत, हा आहे जिल्हा परिषद कार्यालय परिसराचा धक्कादायक प्रकार! प्रश्न हा आहे की, प्रशासन यात लक्ष घालणार का? की एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच कुणीतरी जबाबदारी स्वीकारेल? City News आपल्यासोबत आहे, आणि या मुद्द्यावर लक्ष ठेवून राहील. पुढील अपडेटसाठी City news सोबत राहा!